सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात आंधळी येथे ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ अंतर्गत ग्रामपंचायतीच्या वतीने भव्य बैलगाडा शर्यती पार पडल्या. राज्यात प्रथमच ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने सरपंच दादासाहेब काळे यांनी हा उपक्रम राबवला. आंधळी-टाकेवाडी रोडवरील मैदानावर झालेल्या या स्पर्धेत 'बादल आणि बलमा' या बैल जोडीने प्रथम क्रमांक पटकावला. पश्चिम महाराष्ट्रातील नामवंत बैलगाडा मालकांसह 500 हून अधिक बैलजोड्या या बैलगाडा शर्यतीत सहभागी झाल्या.थरारक शर्यती पाहण्यासाठी हजारो शौकिनांनी गर्दी केली होती. यावेळी विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिक आणि ढाल देऊन गौरवण्यात आले.