सदर बाजार लक्ष्मी टेकडी परिसरात सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे येथील 40 घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या परिसरातील घरांवर काही ठिकाणी विद्युत पोल पडले आहेत तर काही घरांवर झाडे उन्मळून पडल्याने घरासह संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे.