सातारा : कराड उंडाळे विभागात वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांची एकच तारांबळ उडाली. गारपीट झाल्याने आंबा पिकासह काढणीस आलेल्या ज्वारी पिकाचे नुकसान होणार असल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. मात्र गेल्या दोन दिवसापासून उकाडयाने हैराण झालेल्या नागरिकांना पाऊस पडल्याने दिलासा मिळाला आहे.