निसर्गाच्या अद्भुत सौंदर्याचं प्रतीक असलेलं कास पठार सध्या चवर फुलांच्या बहराने नटलं आहे. जागतिक वारसास्थळ म्हणून प्रसिद्ध असलेलं हे पठार साताऱ्यापासून २५ किलोमीटर अंतरावर आहे. सध्या या पठारावर चवर फुलांचा गालिचा पसरल्यामुळे संपूर्ण पठार पांढरंशुभ्र दिसत आहे.