बेंदूर सणानिमित्त माण तालुक्यातील मौजे मोही येथे शेतकऱ्यांनी तब्बल 70 ट्रॅक्टरची भव्य रॅली काढली. काळाच्या ओघात बैलजोड्यांचे प्रमाण कमी झाल्याने, शेतात राबणाऱ्या ट्रॅक्टरप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.