सातारा शहरातील मंगळवार पेठ येथील जय महाराष्ट्र गणेशोत्सव मंडळाच्या मानाच्या गणपतीची मिरवणूक पारंपारिक ढोल ताशाच्या गजरात काढण्यात आली. यावेळी मंडळातील कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. या मिरवणुकीदरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी सातारा पोलिसांनी मिरवणुकीत बंदोबस्त लावला होता.