राज्यभरात वाढलेल्या उन्हाच्या तीव्रतेमुळे थंड हवेचे ठिकाण अशी ओळख असणाऱ्या महाबळेश्वर मध्ये पर्यटकांची गर्दी वाढलेली पाहायला मिळत असून विविध राज्यातून पर्यटक सध्या वाढत्या गर्मीमुळे महाबळेश्वरला पसंती देताना पाहायला मिळत आहे. महाबळेश्वरचे विविध पॉईंटवर आणि वेण्णा लेक येथे नौका विहाराचा आनंद घेताना पर्यटक पाहायला मिळत आहेत.