रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशील मोझर यांनी छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नावाने काढलेल्या गाण्याचे अनावरण करण्यात आले. गायक अवधूत गुप्ते यांनी हे गीत गायले असून याच्या शुभारंभाला उदयनराजेंनी कॉलर उडवत आणि गॉगल लावून कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव गाण्यावर ठेका धरला. यावेळी त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत "मैत्री करायची असेल तर ती सोडायची नाही.माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत मी तुमचा अंगरक्षक बनून राहील" असे उद्गार यावेळी उदयनराजे यांनी काढले.