सातारा : नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मरळी येथील वत्सलादेवी देसाई जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतलेल्या चिमुकल्यांचे अनोख्या आणि उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. ग्रामस्थांच्या पुढाकारातून शाळेत नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची सजविलेल्या बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. या आगळ्यावेगळ्या स्वागत सोहळ्यामुळे संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.