सातारा जिल्ह्यातील पुसेगाव येथील सेवागिरी यात्रेत झालेल्या हिंदकेसरी बैलगाडा शर्यतीत राज्यभरातील ११०० स्पर्धकांनी भाग घेतला. 'सचिन' आणि 'लक्षा' या बैलजोडीने यंदाचा हिंदकेसरी मान पटकावला, तर छत्रपती संभाजीनगरच्या 'सर्जाने' द्वितीय क्रमांक मिळवला. या थरारक शर्यतीचा अनुभव घेण्यासाठी हजारो शौकिनांनी गर्दी केली होती, ज्याची आकर्षक ड्रोन दृश्येही टिपण्यात आली.