लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साताऱ्यातील म्हसवड येथील श्री सिद्धनाथ आणि देवी जोगेश्वरी यांच्या शाही विवाह सोहळ्यास आज दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर विधिवत घटस्थापनेने प्रारंभ झाला.सकाळी हत्ती मंडपात सनई-चौघड्यांच्या गजरात श्रींच्या उत्सव मूर्तींना हळद लावण्याचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. महिनाभर चालणाऱ्या या सोहळ्यात भाऊबीजेला पारंपरिक 'दिवाळी मैदान' आणि तुलसी विवाहाच्या मध्यरात्री मुख्य शाही विवाह संपन्न होणार असून, ९ डिसेंबरला लाखो भाविकांच्या साक्षीने रथोत्सवाने या सोहळ्याची सांगता होईल.