सातारा: छत्रपती संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज पोवई नाक्यावर निषेध आंदोलन करण्यात आले..विश्वास पाटील यांनी संभाजी कादंबरी लिहून महाराष्ट्राची बदनामी केली आहे त्यांनी तात्काळ माफी मागावी तसेच पुस्तकातील दुरुस्ती करावी. अन्यथा आम्ही गनिमी काव्याने जे काही करायचं आहे ते आम्ही करू असा इशारा छत्रपती संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अँड मनोज आखरे यांनी दिला आहे.