सातारा: लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाची वार्षिक चैत्र यात्रा सुरू आहे. यात्रेचा मुख्य दिवस 29 मार्च असून या यात्रेत शंभू महादेव मंदिर ते अमृतेश्वर मंदिर कळसाला मानाचे पागोटे म्हणजेच ध्वज बांधण्याचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.. हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक मंदिर परिसरात एकत्र आले होते. रात्री उशिरा बारा वाजता भगवान शंकर आणि उमापार्वती यांचा विवाह सोहळा पारंपरिक पद्धतीने मंगलमय वातावरणात पार पडला. ध्वजसोहळा आणि विवाह सोहळ्यासाठी पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भातील भाविक शिखर शिंगणापूरमध्ये दाखल झाले आहेत..