ऊस परिषदेत जाहीर झालेला दर मिळेपर्यंत खटाव तालुक्यात ऊसतोड आणि वाहतूक सुरू होऊ देणार नाही,असा इशारा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने धडक मोहीम सुरू केली आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट उसाच्या फडात आणि बांधावर जाऊन तालुक्यातील नऊ गावांमध्ये ऊस वाहतूक रोखून धरली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनीही या आंदोलनाला एकमुखी पाठिंबा दिला आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष करून वाहतूक सुरू ठेवल्यास साखर कारखान्यांच्या गव्हाणी बंद पाडण्याचा इशारा यावेळी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष अनिल पवार यांनी दिला आहे.