कर्नाटकातील सौंदत्ती इथं असलेल यल्लमा देवीचे मंदिर कर्नाटकसह राष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या यल्लमा मंदिरात यावर्षी रेकॉर्ड ब्रेक देणगी जमा झाली आहे. 1 एप्रिल ते 30 जून या काळात तब्बल तीन कोटी 81 लाखाची देणगी या मंदिराला जमा झाली आहे. यामध्ये तीन कोटी 39 लाख इतक्या रोख रकमेचा समावेश आहे तर तीस लाखाहून अधिक किमतीच्या तीन किलो सोन्याच्या दागिन्यांचा ही समावेश आहे.. एप्रिल मे महिन्यात यल्लमा देवीची यात्रा असते या काळात दरवर्षी जमा होणाऱ्या देणगीच्या तुलनेत यावर्षी दुपटीने वाढ झाली आहे. मागच्या वर्षी एप्रिल ते जून या काळात एक कोटी 96 लाखाची देणगी जमा झाली होती.