सावंतवाडी शहरासह नजीकच्या ग्रामपंचायतींना पाणी पुरवठा करणारे पाळणेकोंड धरण ओव्हरफ्लो झाले आहे. सावंतवाडी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्ण क्षमतेने हे धरन भरून वाहू लागल्याने पिण्याच्या पाण्याचा मुबलक पुरवठा सुनिश्चीत झाला आहे. पाळणेकोंड धरण तुडुंब भरले असून धरणातून खाली वाहणारे पाणी वाहत असल्याचे विहंगम दृश्य पाहायला मिळत आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी याच मुख्य उद्देशाने उभारण्यात आलेले धरण पूर्ण भरल्याने समाधान व्यक्त होत आहे. स्थानिक प्रशासनाने धरणातील पाणी साठ्यावर समाधान व्यक्त केले आहे.