इराण,अमेरिक, इस्रायल यांच्यातील युद्धाचे पडसाद आता भारतात देखील उमटू लागले आहेत. भंडारा जिल्ह्यातील डिफेन्स अकॅडमी शाळेत राज्याच्या कानाकोपऱ्यातील मुले, मुली, शिक्षण घेण्यासाठी येत असतात. याच ठिकाणी कॅन्टीन देखील आहे. शाळेत 1200 विद्यार्थी असून त्यांच्यासाठी जेवण तयार करण्यात येतं. पण आता दोन दिवस पुरेल एवढाच गॅस सिलेंडर साठा उपलब्ध आहे.