आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे या उद्देशाने नंदुरबार जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ येथे कोट्यवधी रुपये खर्च करून भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय निवासी शाळा उभारण्यात आली. मात्र, या शाळेत मूलभूत सुविधांचाच अभाव असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.