पुस्तकातील वाघ आता नुसता डरकाळी फोडणार नाही, तर तो वर्गात प्रत्यक्ष फिरताना दिसणार आहे.. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील कदमापूर येथे शिक्षणाचे एक आधुनिक रूप पाहायला मिळत आहे.. जिल्हा परिषद शाळेचे सहाय्यक शिक्षक राजेश कोगदे यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वर्गाचे रूपांतर एका जिवंत जगात केले आहे.. शिक्षण केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित न राहता ते विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवावे, या उद्देशाने कोगदे सरांनी हा उपक्रम हाती घेतला आहे.. पूर्वी शिक्षक फळ्यावर चित्र काढून किंवा व्हिडिओ दाखवून शिकवत असत.. मात्र, आता ए.आय. च्या मदतीने जंगली प्राणी, सरपटणारे जीव, अवकाशातील ग्रहतारे आणि विज्ञानातील अवघड प्रयोग विद्यार्थ्यांना जिवंग स्वरूपात अनुभवायला मिळत आहेत.. विद्यार्थी आता केवळ ऐकत नाहीत, तर पाठातील घटकांशी संवाद साधू शकतात.. पाठातील पात्रांना जिवंत करण्यासाठी व्हॉइस क्लोनिंग आणि चित्र अॅनिमेशनचा प्रभावी वापर केला जात आहे.. भूगोलातील दुर्गम प्रदेश असो वा अंतराळातील ग्रह, हे सर्व विद्यार्थ्यांच्या डोळ्यांसमोर प्रत्यक्ष अवतरत असल्याने विषय समजणे अधिक सोपे झाले आहे. "मुलांनो, इकडे लक्ष द्या" असे म्हणण्याची वेळ आता शिक्षकांवर येत नाही..