कल्याण रेल्वे स्थानक परिसरात रिक्षा थांबवण्यावरून तुंबळ हाणामारी झाली. फिल्मी स्टाईल हाणामारीचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण दिसत असून वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. याप्रकरणी महात्मा फुले पोलिस ठाण्यात दोन्ही रिक्षाचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.