भाईंदर, ठाणे आणि वसईला जोडणाऱ्या वर्सोवा उड्डाणपुलावर सध्या सी बर्ड्सचं मोठ्या प्रमाणावर आगमन झालं आहे. समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या या उड्डाणपुलावर हजारो सी बर्ड्स पाहायला मिळत असून, नागरिकांचे लक्ष वेधलं जात आहे. या पक्ष्यांना पाहण्यासाठी आणि त्यांना खाऊ घालण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होताना दिसत आहे. मात्र, यामुळे वाहतुकीचा वेग मंदावत असून अपघाताचा धोका निर्माण होत आहे. वाहतूक पोलिसांनी नागरिकांना उड्डाणपुलावर थांबू नये आणि नियम पाळावेत, असं आवाहन केलं आहे. पक्ष्यांचा आनंद घ्या, मात्र स्वतःची आणि इतरांची सुरक्षितता जपा, असंही प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.