अर्नाळाच्या समुद्रात बुडालेल्या दोन मुलांचा अद्याप शोध सुरूच आहे. भारतीय तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर, अर्नाळा पोलीस, वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानाकडून मागील 20 तासांपासून शोधमोहिम सुरू आहे. नालासोपाऱ्यातील चार मुलं अर्नाळाच्या समुद्र किनाऱ्यावर पोहण्यासाठी गेले असता भरतीच्या पाण्यात बुडाले होते.