तालुक्यातील आव्हाड मळा इंडिया बुल्स पॉवर प्लांट परिसर येथे वनविभागाने राबवलेल्या मोहिमेला मोठे यश आले असून, चार दिवसात दुसरा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे. इंडिया बुल्स कंपनीच्या परिसरात बिबट्यांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. या पार्श्वभूमीवर वनविभागाने १ एप्रिल रोजी या ठिकाणी पिंजरा लावला होता. २ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास एक बिबट्या अडकल्यानंतर, आज पुन्हा त्याच परिसरात दुसरा बिबट्या जेरबंद झाला आहे बिबट्या जेरबंद झाल्यामुळे कंपनीतील कामगार आणि परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.