मुंबई पोलिसांनी फिल्म अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या जलसा आणि प्रतीक्षा बंगल्याबाहेर सुरक्षा वाढवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा वाढवण्यानंतर अमिताभच्या घराबाहेर २४ तास पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रविवारी अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याबाहेर त्यांच्या चाहत्यांची मोठी गर्दी असते, त्यामुळे पोलिसांनी काल अतिरिक्त पोलिस बंदोबस्त ठेवला होता.