सर्वोच्च न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण निर्णानुसार, पालकांनी भेटपत्राद्वारे मालमत्ता दिली असली तरी मुलांनी त्यांचा सांभाळ करणे बंधनकारक आहे. पालकांना त्रास दिल्यास, त्यांना मालमत्तेतून बेदखल करण्याचा अधिकार पालकांना आहे. मेंटेनन्स अँड वेल्फेअर ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटिझन ॲक्ट 2007 अंतर्गत हे कायदेशीर बंधन आहे, अन्यथा न्यायालय थेट घरातून बाहेर काढू शकते.