मालेगावसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील हजारो हेक्टरवरील पिके करपा,मावा आदी रोगांच्या विळख्यात सापडला आहे. कडाक्याची थंडी आणि दाट धुक्यामुळे पिकांना मोठा फटका बसत आहे. कांदा, गहू, हरभरा यासह इतर पिकांवर बदलत्या वातावरणाचा परिणाम स्पष्टपणे दिसून येत आहे.