वाशिमच्या रिसोड तालुक्यातील कोयाळी बु., कोयाळी खुर्द, आसेगाव, वरुड तोफा आणि शिवारात काल सायंकाळी आलेल्या वादळी वाऱ्याने प्रचंड नुकसान केले आहे. अचानक आलेल्या या वाऱ्यामुळे अनेक घरांचे पत्रे उडून गेले, काही ठिकाणी घरांची पडझड झाली तर अनेक शेतकऱ्यांच्या सौर पॅनलचेही मोठे नुकसान झाले आहे.