नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता अधिकच तीव्र झाली असल्याने, खरीप हंगामातील पिकांपाठोपाठ आता फळबागांनाही दुष्काळाचा मोठा फटका बसू लागला आहे. पावसाअभावी शेती पिकं उध्वस्त झाली असतानाच, पपई उत्पादक शेतकऱ्यांसमोरही मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. नंदुरबार तालुक्यातील चौपाळे येथील शेतकरी राहुल राठोड यांनी आपल्या चार एकर क्षेत्रात तब्बल चार हजार पपईच्या रोपांची लागवड केली होती. या रोपांसाठी त्यांनी एक लाख रुपये खर्च केले.