पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये सध्या युरिया खताची मोठी टंचाई निर्माण झाली असून शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. गॅस टंचाईमुळे खत उत्पादनावर परिणाम झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचं सांगितलं जात आहे. खेड तालुका खरेदी विक्री संघाच्या केंद्रात युरिया खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सकाळपासूनच शेतकरी केंद्राबाहेर जमा होत असून तासन्तास उन्हात उभे राहून खत मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.