पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावरील आडोशी बोगद्याजवळ गेल्या सुमारे १५ तासांपासून टँकर पलटी झाल्याने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. टँकरमधून होणारी गॅस गळती अद्याप थांबलेली नसल्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव महामार्ग दोन्ही बाजूंनी पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. परिणामी महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून हजारो वाहनचालक अडकून पडले आहेत.कोणी पहाटे चार वाजल्यापासून, तर कोणी रात्री तीन किंवा पाच वाजल्यापासून या ठिकाणी अडकले असून अनेकांची फ्लाइट चुकली आहे.