जळगावच्या भडगाव तालुक्यातील गुढे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या गिरणा नदीपात्रातील दोन्ही विहिरींमध्ये मुबलक पाणी उपलब्ध असतानाही गुढे गावातील अनेक भागांत गेल्या 15 ते 20 दिवसांपासून नळांना पाणी आलेले नाही. त्यामुळे नागरिकांना पिण्याचे पाणी विकत घेण्याची वेळ आली असून ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.