जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देखील जालना जिल्ह्यात पाणीटंचाईच्या भीषण स्वरूप पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील 48 गावे आणि 31 वाड्यांमध्ये प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून दररोज 79 टँकरच्या जवळपास 154 खेपा सुरू असल्याची आकडेवारी प्रशासनाने दिली. शिवाय जालना जिल्ह्यातल्या 1 लाख 32 हजार नागरिकांची तहान टँकरच्या पाण्यावर अवलंबून असल्याचं भीषण वास्तव प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीतून समोर आलं आहे.