कसारा गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. 40 हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणी पुरवठा करणारा बंधारा कोरडा पडल्याने गावात पाणी पुरवठा बंद झाला आहे. मोखवणे कसारा ग्रामपंचायतमध्ये पहिल्यांदाच पाणी पुरवठा बंद झाल्याने महिलांवर वणवण भटकण्याची वेळ आली आहे.