पुण्याजवळील राजगुरुनगर शहरात सध्या नागरी समस्यांचा उद्रेक झाला आहे. नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे ड्रेनेज लाईनमधूनच सांडपाणी नागरिकांच्या घरात घुसतेय, ज्यामुळे घरातील फर्निचर, भांडीकुटी आणि इतर जीवन आवश्यक वस्तूंचे प्रचंड नुकसान होत आहे. घरात सांडपाणी येण्यामागे सांडपाणी सोडण्याची योग्य व्यवस्था नसल्याच मुख्य कारण आहे. निकृष्ट ड्रेनेज व्यवस्था असल्याने अनेक नागरिकाच्या घरात सांडपाणी येत आहे यामुळे घरात दुर्गंधी पसरली असून, नागरिकांच्या आरोग्याला धोका वाढला आहे. नगरपरिषद प्रशासनाला वेळोवेळी सांगूनही नगरपरिषद दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय.