मेट्रोचे सांडपाणी म्हणजेच सीवरेज टॉयलेटची पाईपलाईन फुटल्यामुळे संपूर्ण रस्त्यावर घाण, सांडपाणी आणि असह्य दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणारे नागरिक, वाहनचालक आणि परिसरातील व्यावसायिकांचे मोठे हाल होत आहेत. एवढेच नाही तर सार्वजनिक आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. डास आणि रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.