शहादा शहरातील बसस्थानक परिसरात मोकाट गुरांचा अक्षरश धुमाकूळ सुरू असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बाजाराच्या दिवशी मोठी गर्दी असताना हे गुरे रस्त्यावर मोकाट फिरत असल्याने वाहतूक कोंडी, अपघाताचा धोका आणि पादचाऱ्यांना जीविताचा धोका निर्माण झाला आहे. विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना दररोज या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.