आमदार शहाजीबापू पाटील यांच्या सांगोल्यातील कार्यालयाची एलसीबी आणि निवडणूक आयोगाच्या पथकाने तपासणी केली. सभेनंतर झालेल्या या कारवाईमुळे शहाजीबापूंना अश्रू अनावर झाले. पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांनी कटकारस्थान केल्याचा आरोप त्यांनी केला. स्वतःच्याच पक्षाचे सरकार असतानाही त्रास होत असल्याचे सांगत त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे कैफियत मांडणार असल्याचे म्हटले.