शहापूर तालुक्यातील डोळखांब वनपरिक्षेत्रातील गेल्या अनेक दिवसापासून नरभक्षक बिबट्याने दहशत निर्माण केली होती. लाद्याची वाडी येथील आठ वर्षीय कृष्णा आगिवले या निष्पाप मुलाचा बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला अखेर वन विभागाने जेरबंद केले आहे. या कारवाईमुळे परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.त्यामुळे गेल्या काही दिवसापासून निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणातून सुटका मिळून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.