शनिशिंगणापूर गावकऱ्यांसाठी आता शनि मंदिरात गावकरी गेट खुला करण्यात आला आहे. पूर्वी फक्त आरतीच्या वेळी गावकऱ्यांसाठी गावकरी गेट खुला ठेवण्यात येत होतं. मात्र आता जोपर्यंत मंदिर सुरू असेल तोपर्यंत गावकरी गेट सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.