साताऱ्यात शरदचंद्र पवार पक्षाकडून जनआक्रोश निर्णायक हल्लाबोल मोर्चाला काढण्यात आला.शेतमालाला हमीभाव नाही, पिक विमा आणि नुकसान भरपाई बाबत अन्याय, महागाई, इंधन दर वाढ आणि बेरोजगारी या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला आहे.