नंदुरबार जिल्ह्यात हवामानातील बदलामुळे कांद्याची आवक घटल्याने बाजारभावात मोठी वाढ झाली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत बाजार समितीत कांद्याची आवक ८०० ते १ हजार क्विंटलवरून सध्या ५०० क्विंटलपर्यंत घसरली आहे. त्यामुळे चांगल्या दर्जाच्या कांद्याला प्रतिकिलो तब्बल २२ रुपयांपर्यंत दर मिळत असून, शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, नंदुरबार जिल्ह्यात स्वतंत्र कांदा बाजारपेठ नसल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.