वाशिम जिल्ह्यात मागील दोन दिवसांत साखरेच्या दरात मोठी वाढ झाली आहे. दोन दिवसांपूर्वी ६१ ते ६२ रुपये किलो असलेली साखर आता होलसेल बाजारात ७८ रुपये किलोपर्यंत पोहोचली आहे. तर किरकोळ बाजारात साखरेचा दर ८० ते ८२ रुपये किलो झाला आहे.