टरबुजाची निर्यात थांबल्याने जळगावमधील शेतकऱ्याने शेतात टरबूज खाण्यासाठी हजारो मेंढ्या बकऱ्या सोडल्या. जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर भुसावळ टरबूज उत्पादकांमध्ये तीव्र संताप दिसून आला. सहा एकराच्या टरबुजाच्या शेतात शेतकऱ्याने संतापाच्या भरात मेंढ्या आणि बकऱ्या शेतात चारण्यासाठी घातल्या. शेतात हजारो मेंढ्या बकऱ्या टरबूज खात आहेत.