नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील बारड येथे शीतला देवी मंदिर हे अत्यंत प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. येथे दरवर्षी मोठी यात्रा भरते. ही यात्रा प्रामुख्याने चैत्र महिन्यात भरते. चंद्रपूर येथील महाकाली देवीच दर्शन घेतलेले भाविक बारड येथील शीतला देवीच्या दर्शनासाठी येण्याची जुनी परंपरा आहे. महाराष्ट्रातील विविध भागासह तेलंगणा आणि कर्नाटकामधील भाविक शीतला देवीच्या दर्शनासाठी येत असतात. भाविकांचा मोठा उत्साह या यात्रेमध्ये बघायला मिळतो.