राज्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्याने ठिकठिकाणी चाऱ्याची आणि पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. भटकंती करून मेंढ्या चारणाऱ्या मेंढपाळांना चाऱ्याच्या शोधात दूरवर जावे लागत आहे. मेंढ्यांसाठी पाणी मिळवणंही कठीण झालं असून, विकतचा चारा घेणं परवडत नसल्याने मेंढपाळांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. या दुष्काळात आपल्या मेंढ्यांना जगवायचं कसं, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.