बच्चू कडू यांच्या चक्काजाम आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मेंढपाळांनी अमरावती यवतमाळ महामार्ग रोखला. अमरावती जिल्ह्यातील चिरोडी गावात शेतकरी संतापले असून त्यांनी शेकडो मेंढ्या रस्त्यावर आणून महामार्ग रोखला. कर्जमाफी सोबत मेंढपाळांच्या समस्या सुद्धा सरकारने तात्काळ निकाली काढाव्या अशी मेंढपाळांची मागणी आहे.