राज्यातील अनेक भागांमध्ये पाणीटंचाई तीव्र झाल्याने चारा आणि पाण्याच्या शोधात मेंढपाळांना आपल्या मेंढ्यांच्या कळपासह गावोगावी भटकंती करावी लागत आहे. चांदवड तालुक्यातील दिघवद येथील विहिरींनी तळ गाठण्यास सुरुवात केली असून ओढे, नदी- नाले कोरडे पडल्याने मेंढपाळांना पाणीटंचाईची मोठी समस्या जाणवणात आहे. नदीपात्रामध्ये थोडे पाणी शिल्लक असल्याने पाणी पिण्यासाठी मेंढ्यांनी गर्दी केल्याचे दुश्य उन्हाळ्याच्या सुरुवातीला पाहायला मिळत आहे.