शिफा बिलाल चाऊस यांनी माजलगाव नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत शरद पवार गटातून निवडून आलेल्या चाऊस यांचे आगमन प्रशासकीय अधिकारी, नगरसेवक आणि नागरिकांच्या उपस्थितीत झाले. बीड जिल्ह्यातील माजलगावच्या विकासासाठी त्यांचे नेतृत्व महत्त्वाचे ठरणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.