लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री शंभू महादेवाची शिखर शिंगणापुर इथली यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. हे देवस्थान छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणूनही ओळखलं जातं. या देवस्थानच्या यात्रेचा प्रारंभ गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर पारंपारिक पद्धतीने होतो.