तळकोकणात शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. सिंधुदुर्गातील कुडाळ मधील नेरूर गावातील सायचे टेंब येथे शिमगोत्सवात मांड उत्सव साजरा केला जातो. आकर्षक, कल्पक आणि भव्यदिव्य असे वैविध्यपूर्ण चित्ररथ देखावे मांड उत्सवात लक्षवेधी असतात. चलचित्रांसोबतच पारंपरिक वेशभूषेचा साज, विविध सोंगांसह खेळांच्या कलाविष्काराचे अप्रतिम सादरीकरण करीत कलाकार उपस्थित रसिक प्रेक्षकांची मने जिंकतात. अफाट गर्दी, नेत्रदीपक तसेच भव्यदिव्य, पौराणिक देखावे पाहण्यासाठी सिंधुदुर्गासह महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील हजारो रसिक प्रेक्षकांनी गर्दी. पौराणिक कथासारावर आधारित एकापेक्षा एक सरस असे मोठ मोठे आकर्षक चित्ररथ देखाव्यांचे सादरीकरण. अभंगांच्या तालावर कलाकारा ताला - सुरात लेझीमच्या तालावर नाचत, कलाविष्कार पाहण्यासाठी देवभूमी कोकणात एकदा तरी जावं.